ध" चा "मा" कसा होतो ?

 



"ध" चा  "मा" कसा  होतो ? 


          ✴️ बरेचदा काही लोक मोठ्या धर्मसंकटात असतात. त्यांचे म्हणणे असे असते कि, माझ्या एका मुलाचे जन्मनाव एके ठिकाणी विचारले, तर त्यांनी एक नाव व राशीं पण सांगितली, आमच्या सासूबाई नी  त्यांच्या ओळखीच्या ज्योतिष्याना  विचारले, तर त्यांनी वेगळेच जन्मनाव व राशीं सांगितली. यातून खरे कुणाचे मानायचे ?  एका व्यक्तीस 2 जन्मनावे असतात काय ?. त्यांचा हा प्रश्न स्वभाव सुलभ असतो . ही समस्या बरेच जातका च्या बाबतीत दिसून येते. 


      ✴️ यात सहसा 2 शक्यता असतात.  एक म्हणजे, जातकाचा जन्म बहुदा  उत्तररात्रींचा असतो व नेमकी जन्मवेळ सांगताना, 11 तारखेस गुरुवारी रात्री 12:30 वाजता अशी सांगितली जाते. वास्तविक, रात्री 12 नंतर तारीख बदलते. त्यामुळे ती जन्मवेळ, खरी 12 तारीख व 00:30 अशी नोंदवायला हवी. व अधिक गोंधळ टाळण्यासाठी, उजाडणारा वार शुक्रवार होता, अशी पुस्ती जोडावयास हवी.  जातकाच्या पालकांना, अशा संभाव्य गोंधळाची कल्पना नसल्यास,  ज्योतिष्यानी, त्यांना ते समजून सांगायला हवे. त्यामुळे पत्रिका पाहताना एकीकडे 12 तारीख घेतली जाते, तर दुसरीकडे  11 तारीख घेतली जाते. त्यामुळे  24 तासांचा  फरक पडून, त्या दोन पत्रिकात  नक्षत्र, राशीं  यात साम्य आढळत नाही. बहुदा असा गोंधळ,  पूर्वी खेड्यापाड्यातून फार  आढळून यायचा. दिवसेंदिवस जागरूकता वाढल्याने आता त्याचे प्रमाण, नगण्य स्वरूपात आढळून  येते.  

  
         ✴️ दुसरा गोंधळ,  जन्मक्षराच्या बाबतीत होण्याची शक्यता असते.  उदा. चा, ची, ही अक्षरे रेवती नक्षत्राची,  मीन राशीची, तर चू ,चे, चो ही अक्षरे अश्विनी नक्षत्रांची व मेष राशीची आहेत. असे बरेच नक्षत्रांच्या बाबतीत आहे.  पण हा सूक्ष्म फरक,  बरेचदा, पालक लक्षात घेत नाहीत व " च" च्या बाराखडीतील कुठलेही परिचित वा सोयीचे नाव, जन्मनाव, गृहीत धरतात,  त्यामुळेही गोंधळ निर्माण होतो. जन्माक्षर बदलल्याने, राशीं, नक्षत्र, गण, योनी आदि  तपशील सुद्धा बदलू शकतो.  त्यासाठी जन्माक्षर, जे निघाले ते, तसेच्या तसें,  लक्षांत ठेवणे अगत्याचे आहे. 



       ✴️ कुंडली तयार करताना,  अगोदर क्षेत्रीय पंचांगाचा आधार घेतला जात असे. आजकाल,  कुंडलीविषयक अनेक सॉफ्ट वेअर, सहजासहजी उपलब्ध असल्याने,  सर्रास त्यांचा वापर केला  जातो. याबाबत  एका सॉफ्टवेअरवर अवलंबून न राहता,   2 साफ्टवेअर  वापरावे. क्वचित काळी एकाच जन्मवेळेबाबत,  2 सॉफ्टवेअर मध्ये पाठभेद आढळतो. जन्म स्थळाचे अक्षांश - रेखांश च्या संख्येतहि फरक असला, कि असे घडते. अशावेळी ,  निर्णयासाठी,  पंचांगाचा आधार घेणे क्रम प्राप्त असते. कारण कुंडली ही बिनचूक  असली,  तरच फलादेशात अचूकता येऊ शकते. 
  

  ✴️ कुंडली चुकीची असेल, तर  फलात  आमूलाग्र बदल होऊ शकतो. 
    

 ✴️ एका पत्रिकेच्या बाबतीत 2 सॉफ्टवेअर, जातकाचे मीन लग्न 2 अंश दर्शवित होते. 
   

 

  ✴️ पण त्यांच्या पालकांनी पाठविलेली कुंडली मात्र, पंचांगांधारे बनविलेली असून,  कुंभ लग्नाची व  लग्नी शनी, व सप्तमात मंगळ दर्शवित होती. सप्तमेश रवि व्ययात होता. फलिताच्या दृष्टीने, विवाहाबाबत ही पत्रिका निश्चितच बऱ्याचशा अडचणी दर्शवित होती.

💢 ही पत्रिका,  कितीतरी स्थळी,  अगोदर पाठविली गेली असेल. व प्रथम दर्शनी,  विवाह स्थान बाधित दिसल्याने,  कितीतरी स्थळांकडून,  नकार आला असेल, त्यांची कल्पनाच केलेली बरी.

💢 अशावेळी, परिचय पत्रातील ठोकळा कुंडलीवर विश्वासून न राहता, दिलेल्या जन्म तपशिलानुसार ती बरोबर आहे की नाही ? हे पाहणे नितांत आवश्यक असते. 
   

 

  ✴️ नेमकी खरी कुंडली कोणती ? ही एक परीक्षाच होती. क्षेत्रीय पंचांगही कुंभ लग्नच दर्शवित होते. दोन्ही साफ्टवेअर मात्र मीन लग्नच दाखवीत होते. 
   

     पुन्हा पंचांग उघडले. दैनिक लग्न समाप्ती कोष्टक उघडले. जातकाची जन्मवेळ सकाळी 10:30 ची  होती. कोष्टकात मकर लग्न समाप्ती काल 08:47 तर कुंभ लग्न समाप्ती काल 11:22 दर्शविलेला होता. 
    

    जातकाची जन्मवेळ 10:30 ची असल्याने ते कुंभ लग्न असावे असे प्रथमदर्शनी वाटत होते. पण सॉफ्टवेअर मीन लग्न 2 अंशावर दर्शवित होते. पंचांगाप्रमाणे जातकाच्या जन्मानंतरही कुंभ लग्न 52 मिनिटे कार्यरत होते,  असे दिसत होते. 
    

    ✴️ मुळात कुंभ लग्न प्रारंभकाळा पासून 1 तास 36 मिनिटे  कार्यरत असते. म्हणून मकर लग्न समाप्ती काळात,  1 तास 36 मिनिटे मिळवली,  तेव्हा उत्तर ( 08:47 +1:36= 10:23 ) आले. म्हणजे  कुंभ लग्न समाप्ती काळात चुकून 10:23 ऐवजी 11:22 छापले गेले होते.
    

   ✴️ मनुष्याने कितीही काटेकोरपणे काम केले, तरी कधी-कधी, अनवधानाने,  त्रुटी  राहतातच. 
     

   ✴️ समस्या सुटल्याचे समाधान झाले. मीन लग्न असल्याने सर्व ग्रहात स्थानबदल झाला,  हे ओघाने आलेच. 
     

  ✴️ असा हा  " ध " चा झालेला " मा " कुंडलीत हि  प्रभाव दाखवतोच.  


  🔼वरील लेखातील माझे विचार माझे  वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत. 

ते आपणा सर्वाना अवगत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच आहे.  

🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये  कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल.  🙏🌺🌺🌺               




‌ 

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली