कारावास योग -उत्तरार्ध

 


.



( पूर्वसूत्र : कारावास  योग याच ब्लाँगवर  दि. 5 ऑक्टोबर 2020 रोजी प्रकाशित झाला आहे. ) 

..कारावास योग - उत्तरार्ध 


▪️ कारावास योगाचे खरे स्वरूप काय ?, याबद्दल,  आलेल्या स्वानुभवानुसार, " भविष्य दर्पण " च्या, सप्टेंबर 2020  च्या  अंकात कारावास योगाचे स्वरूप,  विशद केले आहे. तो लेख या ब्लाँगवर 5 ऑक्टोबर 2020 या दिवशी प्रसारित केला आहे. वाचनात सुसूत्रता यावी म्हणून, आपण तो वाचू शकाल. 

▪️ " कारावास योग " म्हणजे,  तुरुंगात जाणे, हा सरळ -सरळ अर्थ असला,  तरी त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती,  वा अजाणते पणी गुन्हा होणे,  किंवा गुन्ह्यात अडकणे,  वा कुणीतरी अडकवणे, अशी सबळ कारणे असावी लागतात.



त्यामुळे,  तशा प्रकारचे योग कुंडलीत आहेत की काय ?  याचा पडताळा घेणे जरुरी असते.

▪️ तसे काही कुंडलीतून न आढळल्यास,  जर काही ग्रह, " कारावास योग " सांगत असतील,  तर मात्र  तो योग , आरोग्य विषयक काही समस्या निर्माण होऊन,  हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची,  पाळी आणू शकतो.

▪️ याबद्दल आपण मागील अंकात सविस्तर विवेचन केले आहेच .

▪️ एकूण लोकसंख्येचा विचार केला असता, आपल्या सामाजिक परिस्थिती नुसार, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे  जातक,  अल्पप्रमाणात असतात ,  त्यांच्या तुलनेने,  हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण, मात्र  अधिक असते. ही कारावास योगाची दुसरी बाजू होय.

▪️ इथे, अजून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की,  गुन्ह्यासंबंधी जातकाला चौकशी संबंधी,  संशयित म्हणून,  पोलिस स्टेशनला बोलावले गेले,  समाजा तील लोक आपल्याकडे शंकेने पाहू लागले,  अपराधीपणाचे भाव,  आपल्या चेहऱ्यावर उमटले,  तरी तो " कारावास योग " झाला,  असे म्हणावे लागेल.

▪️ माझ्या मते,  हे कारावास योगाचे, सौम्य स्वरूप आहे.

▪️ तसेच कुठलीहि  घटना,  तिला काही कार्यकारण भाव असल्याशिवाय,  घडत नाही. हा कार्यकारण भाव निर्माण होण्यासाठी,  कुंडलीतील इतर ग्रह स्थिती,  या योगास मदत करत असते.


▪️ उदाहरणार्थ गुरु -शनि, दृष्टी -युति  योग,  या योगात ॲसिडिटी, ते जलोदराच्या आजारा पर्यंत, या योगाची व्याप्ती दिसते. लिव्हर खराब होणे, हा या योगाचा मूळ आत्मा आहे. मग ते,  वयोमानानुसार शरीरात थकल्याने,  वा पिण्याचे पिण्याचे व्यसन असल्यास,  तरुणपणीहि  होऊ शकतात . थोडक्यात, व्यसन पूर्तीसाठी,  द्वितीय स्थानातील जल  राशीच्या ग्रहांनी,  कारावास योगाच्या संपन्नतेसाठी, कार्यकारण भाव निर्माण करून,  सहयोग केलेला असतो.

▪️ म्हणून कुंडली पाहताना,  केवळ, एका ग्रहस्थितीचा विचार करून भागत नाही. सर्व ग्रह योगांच्या फलिताच्या, उभ्या- आडव्या धाग्यांनी,  कुंडलीचे वस्त्र,  विणलेले असते.

▪️ कुंडलीत व्ययेश  व कष्टेश  यांचा अन्योन्यसंबंध असेल,  दृष्टी योग वा युति योग असेल,  तर तो बदनामी केल्या शिवाय राहात नाही. त्यामुळे व्यक्तीची पत लयाला जाते. नावलौकिकास कलंक लागतो.

▪️ व्यय भावाचा स्वामी,   ज्या स्थानात असेल, व ज्या ग्रहासोबत असेल,  वा ▪️ ज्या  भावाचा स्वामी,  व्यय भावात असेल,  त्या त्या भावाच्या कारकत्वा नुसार, वा त्या  ग्रहाच्या कारकत्वाच्या अनुषन्गाने  अशी अशुभ  फले निर्माण होऊ शकतात.

▪️ शनि- मंगळ,  वा रवि- शनी,   युती -दृष्टी योग,  विशेषत  अंशात्मक व क्रूर नक्षत्रात असल्यास,  अशा प्रकारची  फळे मिळू शकतात.

▪️ या संदर्भात, उदाहरणादाखल,  गुन्हेगारी पार्श्वभूमीतून,  कारावास योग निर्माण होणाऱ्या,  तसेच आरोग्य विषयक समस्या असल्यामुळे,  हॉस्पिटलमध्ये,  काही काळ घालवलेल्या,  जातकाच्या  कुंडल्या पाहणार आहोत.

कारावासाची पहिली बाजू गुन्हेगारी संबंधित आपण "  कुंडली क्र. 1 " विचारात घेऊ. 
 



▪️ या कुंडलीत,  कुंभ लग्नी  बुध 22 अंशावर,  अस्तंगत असून,  17 अंशावर असलेल्या  वक्री राहूच्या,  युतीत आहे. 
▪️ द्वितीयात रवि 0 अंशावर,  व शुक्र 12 अंशावर आहे. 
▪️ तृतीयात शनि+ मंगळ युती, प्रत्येकी 12 अंशावर आहे. 
▪️ पंचमात मिथुनेचा चंद्र,  1 अंशावर. ▪️अष्टमात  वक्री  प्रजापति, 13 अंशावर व  भाग्यात, वक्री  गुरु,  11 अंशावर आहे.
▪️ दशमात वृश्चिकेचा  नेपच्यून, 7 अंशावर आहे.

▪️कारावास योगासाठी,  वर्णन केलेले योगा पैकी,
⚛️ व्ययेश  शनीच्या दृष्टीत,  कष्टेश  चंद्र येतो. 
⚛️ तसेच शनी व मंगळ अंशात्मक युती आहे.

▪️ या कुंडलीची,  थोडक्यात पार्श्वभूमी अशी की,▪️ पंचमेश बुध, मेष नवांशी असून, लग्नी, स्व नक्षत्रातील राहू युक्‍त असल्याने,  व पंचमात कष्टेश  चंद्र असल्याने, तसेच शिक्षणाचा कारक गुरु व पंचमातील कष्टेश चंद्र हे दोन्ही ग्रह, शनीने  बाधित असल्याने,  शिक्षणात गती कुंठित  झाली .
▪️ अष्टक वर्गात,  पंचम स्थानास  फक्त पंचवीस (कमी) गुण आहेत. 
▪️ तृतीयातील, कर्क नवांशातील, शनी मंगल युति,  धाकट्या भावाचे सुख देत नाही.परिणामी जातकच  शेंडेफळ असल्यामुळे,  अतिशय लाड झालेत पंचमेश बुध  राहूयुक्‍त असल्याने,  व त्यावर राहूच्या नक्षत्रातील, लाभेश  गुरुची दृष्टी असल्याने, आंतर जातीय  प्रेम प्रकरण झाले पण,  चंद्रावरील शनी दृष्टीने,  त्यात यश आले नाही. शुक्र- प्रजापती दृष्टीयोगानेहि अपयशासच दुजोरा दिला. चंद्र -गुरु  नव पंचम  योगामुळे,  विरह झाला.
▪️ शनीच्या चंद्रावरील दृष्टीमुळे,  थोडे नैराश्य आले. 
▪️ त्या नैराश्याच्या निमित्ताने, धनस्थानातील मीन या जलराशीतील  शुक्राने,  पिण्याच्या व्यसनास  उद्युक्त केले.हा शुक्र शनीच्या नक्षत्री असून स्व नवांशात आहे. 
▪️ तसेहि  स्थिर लग्नास,  शुक्र भाग्येश  असल्याने,  बाधकच  ठरतो.
▪️ लग्नेश चर राशीत,  व अष्टमेश स्थिर राशीत असता,  व्यक्तीं मध्यायु असते., ▪️ लाभेश असलेले  गुरुमहाराज,  शत्रू राशीत,  वक्री असून,  शनि- मंगळाच्या दृष्टीत असल्यामुळे,  मित्रमंडळीहि  सु संस्कारी  नव्हती.
▪️ समान शीले व्यसनेषू सख्यम ! दुसरे काय ?
  ▪️ पराक्रमेश  मंगळा बरोबर, व्ययेश  शनीची,  तृतीयात अंशात्मक युती असल्याने,  नको त्या ठिकाणी,  केलेला पराक्रम,  अंगाशी येऊन गुन्हा घडला. त्याचे पर्यवसान,  अल्पशा कारावास योगात झाले.
▪️ त्याची परिणती वाढत्या व्यसनात होऊन, गुरू शनी दृष्टी योगामुळे,  लिव्हर खराब झालेत .गुरु राहूचे नक्षत्री, तर शनी केतुचे नक्षत्री आहे.  त्यामुळे हॉस्पिटलायझेशन  झाले, ( पुन्हा कारावास - मेडिकल या अर्थाने ) पण विकार,  प्रमाणाबाहेर बळावल्याने,  तब्येतीत सुधार झाला नाही. 
▪️ अष्टक वर्गात लग्नास 31 बिंदू तर कष्टस्थानास  33 बिंदू आहेत.

▪️ कुंडलीत  लग्नेश, अष्टमेश,  व अष्टमाचा अष्टमेश,  म्हणजे तृतीयेश,  या तिघांचा, परस्परांशी युती- दृष्टी,  वा स्थान संबंध असू नये. हा योग,  आयुष्य कमी करणारा आहे. त्यामुळे व्यसनाधीनतेने,  जीवनाची इतिश्री झाली.

कुंडली क्र. 2 -



 ▪️ हा आरोग्यावर आधारित,  "बंधन योग "आहे. ही एका जातिकेची  कुंडली असून,

▪️ कन्या वर्गोत्तम लग्न 27 अंशावर, लग्नी  वर्गोत्तम मंगळ 26 अंशावर,  व नेपचून 17 अंशावर आहेत. 
▪️ धनस्थानी केतू  15 अंशावर, , ▪️ तृतीयात,  ज्येष्ठा नक्षत्रातील गुरु 25 अंशावर, ▪️ पंचमात मकरेचा  चंद्र 27 अंशावर,  ▪️ अष्टमात राहू 15 अंशावर ▪️ दशमात, आर्द्रा नक्षत्रातील  शुक्र 18 अंशावर,+ 6 अंशावरील प्रजापतीच्या युतीत आहे. ▪️ लाभात आश्लेषा नक्षत्रातील,  21 अंशा वरील प्लुटो ▪️ तर व्ययात  मघा  नक्षत्रातील,  स्वराशीचा रवि , 2 अंशावर, + अस्तंगत 10 अंशावर  असलेला  बुध +, 2 अंशावर असलेल्या मघा नक्षत्रातील,  अस्तंगत शनिसह विद्यमान आहे. हे तिन्ही ग्रह, कर्क रोगाचा कारक असलेल्या केतूच्या नक्षत्री आहेत.

⚛️ अगोदर नमूद केल्यानुसार, या कुंडलीतहि  कष्टेश शनि,  क्रूर नक्षत्री असून,  तो व्ययेश रविसह,  अंशात्मक युती योगात आहे., 
⚛️ लग्नेश बुध अस्तंगत स्थितीत,  व्ययस्थानी आला आहे.
⚛️ लग्नेश व्ययस्थानी, व्ययेशासह  असणे, क्रूर नक्षत्री  असणे,  आरोग्याच्या दृष्टीने,  निश्‍चितच चिंतनीय आहे 
⚛️ भरीस भर म्हणून,  कन्या लग्नाचा कट्टर शत्रू मंगळ,  लग्नस्थानी वर्गोत्तम होऊन,  नेपच्यूनसह  विराजमान आहे.
⚛️ विशेष म्हणजे लग्न बिंदू वर्गोत्तम असून,  27 अंशावर, तर मंगळ  26 अंशावर आहे.
⚛️ कुंडलीत रवी, गुरु, शुक्र,  शनि महत्वाचे ग्रह,  क्रूर नक्षत्रात आहेत.
⚛️ चंद्र कुंडलीतहि  चंद्राचे  अष्टमस्थानात,  चंद्र लग्नेश +अष्टमेश + कष्टेश अशी त्रयी,  निर्माण झालेली आहे.

▪️ D-27 कुंडलीतहि  कष्टेश  गुरु,  कष्ट  स्थानीच असून, मूळ कुंडलीतील व्ययस्थानातील रवि-शनी युती,  याहि  कुंडलीत,  व्ययस्थानात,  विद्यमान आहे.

▪️ क्रूर नक्षत्रातील, व दु:स्थानातील,  परस्पर शत्रू असणारे,  रवी व शनी ग्रह,  "अंशात्मक" योगात असल्यामुळे,  आरोग्याबाबत, अतिशय क्रूर स्थिती निर्माण होते. हा योग,  असाध्य आजार देणारा आहे. ही युती ज्या स्थानात असेल,  त्या स्थानाच्या अनुषंगाने,  किंवा ग्रहाच्या कारतत्वाच्या अनुषंगाने,  किंवा हे ग्रह ज्या  ग्रहास पहात असतील,  त्याच्या  स्थानानुसार,  वा कारकत्वानुसार,  कर्करोगाची, संभावना असते.

▪️ त्याप्रमाणे, ही जातिका,  कॅन्सरग्रस्त झाल्याने, भरपूर हॉस्पिटलायझेशन झाले. कर्करोगासाठी केलेली उपाय योजना,  किती वेळखाऊ, खर्चाची, व त्रासदायक असते, हे वेगळे सांगायची गरज नाही. औषध योजना केल्यानंतरहि  त्यात अपेक्षित यश न आल्यामुळे,  जातिकेस अखेर मृत्यू आला.



कुंडली क्र. 3 



▪️ अज्ञानामुळे वा भोळसट स्वभावामुळे,  व्यक्तीस कसे फसविले जाते ? व नावास  कलंक लागतो,  यासाठी या योगाची ही तिसरी कुंडली, उत्तम उदाहरण मानता येईल.

▪️ या जातकाचे तुला लग्न 12  अंशावर असून,  लग्नी बुध,  5 अंशावर व गुरु, 4 अंशावर आहे ▪️चतुर्थात स्वराशीचा शनी,  वक्री,  29 अंशावर असून, 14 अंशावरील राहुच्या युतीत आहे.▪️ सप्त मात मेषेचा वक्री प्रजापती,  7 अंशावर असून, ▪️ अष्टमात वृषभेचा चंद्र 26 अंशावर आहे, ▪️ दशमात कर्केचा,  आश्लेषा नक्षत्रातील,  25 अंशावरील मंगळ,  केतू व प्लुटोच्या युतीत आहे ▪️ लाभात सिहेचा नेपच्यून  20 अंशावर,  तर शुक्र 29 अंशावर आहे. ▪️ व्ययस्थानात रवि 12 अंशावर आहे.

⚛️  लग्नी  असणारे बुध -गुरु, हे व्ययेश व कष्टेशाची भूमिका बजावतात. यामुळे  " बंधन योग " निर्माण होतो.
⚛️ या बंधन योगास,  शनि + राहु युति चा, क्रूर नक्षत्रातील मंगळाशी होणारा केंद्रातून प्रतियोग, अधिक पोषक होत आहे.

▪️ जातक,  समाजात आदर प्राप्त असलेला शेतकरी असून,  याच्या शेताच्या कुंपणाजवळून,  बैलगाडीची वाट होती. त्या रस्त्यावरून जाणारे पांथस्थ,  थोडा विसावा मिळण्याचे दृष्टीने,  शेतातील झाडाखाली बसत असत. त्यापैकी कोणीतरी,  खोडसाळपणे,  कुंपणात,  सहज दिसणार नाहीत अशा रीतीने, काहि  गांजाची झाडे लावली. येता-जाता, व्यसन पूर्तीचा,  आनंद घेता यावा,  हा त्यामागील उद्देश असावा.

▪️ शेतमालक या बाबतीत, पूर्णपणे अनभिज्ञ होता.

▪️ परंतु,  वर वर्णन केलेल्या, कुंडलीतील ग्रहानुसार,  विपदा यायचीच असावी. कारण,  या गोष्टीचा सुगावा लागताच,  पोलीस कारवाईला, तोंड द्यावे लागले. स्वतःचा कुठलाहि  दोष नसताना,  यात गोवले गेल्यामुळे,  किती मनस्ताप झाला असेल ?,  याची कल्पनाच केलेली बरी. ही कुंडली, या घटनेमधून,  ग्रह योगाकडे दुर्लक्ष करून चालत नाही,  हाच संदेश देते.

कुंडली क्र 4



ही  कुंडली, आरोग्यासाठी असलेल्या "बंधन योगाची "आहे.

▪️ या जातकाचे मीन लग्न 6 अंशावर  असून ▪️ तृतीयात वृषभेचा  चंद्र,  10 अंशावर, ▪️ पंचमात कर्केचा शनीच्या नक्षत्रातील, कन्या नवांशी असलेला   मंगळ, 9 अंशावर, व शनीच्या नक्षत्रातील राहु, 11 अंशावर, ▪️ रक्ताचा कारक मंगल कर्क या कँसर चे प्रतिनिधित्व करणाऱ्या नीच राशीत शनी व राहूने दूषित झाला आहे. ▪️ षष्ठात सिंहेचा प्रजापतीहि,  12 अंशावर, कॅन्सरच्या कारक असलेल्या, लाभातील केतूच्या नक्षत्री आहे  ▪️ सप्तमात कन्येचा रवी 29 अंशावर,कन्या नवांशीच असून, 13 अंशावरील बुधा सोबत ▪️ अष्टमात तुळे चा  नेपच्यून, 16 अंशावर ▪️ नवमात वृश्चिकेचा शुक्र, 3 अंशावर ▪️ लाभात मकरेचा शनी व केतू प्रत्येकी 11 अंशावर ▪️ व्ययस्थानात कुंभेचा वक्री गुरु, राहूच्या नक्षत्री असून  9 अंशावर, स्व नवांशी आहे.▪️ गुरु प्रजापती दृष्टी योग, मधुमेहाचे दुखणे देतो. ▪️ शनी हाडांचा कारक, राहू -मंगळाच्या अंशात्मक दृष्टीत असल्याने, व कष्टातील सिहं राशीं पाठीचे प्रतिनिधित्व करीत असल्याने, पाठीच्या कण्याचे आजार उत्पन्न झाले.

💢 हा जातक,  मधुमेह, पाठीच्या कण्याच्या प्लेट्स सरकल्यामुळे कंबरदुखी,  व रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे.
▪️ D-27 मध्येहि मीन लग्न असून, शनी केतू युति,   तृतीय स्थानी आली आहे. 

⚛️ लग्नेश व्ययस्थानी असणे,  आरोग्याच्या दृष्टीने,  चांगले नसते.

⚛️ व्ययेश  शनि,  केतूच्या अंशात्मक युतीत असून,  जल राशीतील नीच मंगळाच्या दृष्टी योगात आहे. यात शनी 11 अंशावर,  व मंगळ 9 अंशावर आहे.

⚛️ शनी -मंगळ  युति - दृष्टियोग अंशात्मक वा क्रूर नक्षत्री असता,  ते ज्या स्थानी असतील, त्या स्थानाच्या कारकत्व संबंधाने,  वा यापैकी कोणी,  ज्या ग्रहास पहात असेल,  त्या ग्रहाच्या स्थानासंबंधी, वा कारकत्वासंबंधी,  कर्क रोगाची पीडा संभवते.

💢 असे हे  बंधन योगाचे, " कारावास योगाचे ", आगळे - वेगळे  स्वरूप  सांगता येईल.



विशेष : हा लेख श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष्य संशोधन केंद्र, जळगाव द्वारा संचालित, इ -मासिक ⚛️ " भविष्य दर्पण " ⚛️-दिवाळी अंक 2020 या मासिकात  प्रकाशित झाला आहे. 

== पुंडलिक दाते, अकोला. 
      9421755299


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली