Posts

Showing posts from June, 2021

नेपच्यून बद्दल, थोडा स्पष्ट विचार.

Image
  💢 नेपच्यून बद्दल, थोडा स्पष्ट विचार .💢 💢 कष्ट स्थानात व अष्टम स्थानात जर नेपचून असेल तर, अनुक्रमे, अशी फळे सांगण्यात येतात. 💢 कष्ट स्थानी नेपच्यून असला, की पोटात विषारी पदार्थ जाण्याची शक्यता असते. 💢 दूषित अन्न सेवनामुळे सुद्धा, यांना वीषबाधा होऊ शकते. विशेषतः बुरशी आलेले पदार्थ, दुधापासून बनलेले पदार्थ यापासून, फूड पॉयझन होऊ शकते. एक्सपायरी डेट निघून गेलेली, औषधे घेतली गेलीत तरिहि, त्रास होऊ शकतो. 💢 अशा जातकाने कोणतेहि औषध घेण्यापूर्वी, त्याची एक्सपायरी डेट बघावी. अन्यथा अनुचित घटना होऊ शकते. 💢 परंतु आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, वर वर्णन केलेल्या केसेस, त्या मानाने कमी सापडतात. 💢 पण कुंडलीत, जातकाचा स्वभाव रागीट असल्यास, बुध  मंगळ अशुभ स्थितीत, दृष्टी -युति योगात असता असता, एका टोकाची भूमिका घेण्याची प्रवृत्ती असल्यास, घरात वा कार्यालयात, मनाविरुद्ध काही परिस्थिती निर्माण झाल्यास, असे जातक, काही विषारी पदार्थ, हेतुपुरस्सर खाऊन,  स्वतःचे जीवन, धोक्यात आणण्याची शक्यता असते. 💢  म्हणून, या नेपच्यूनचा विचार करताना, कुंडलीतील इतर ग्रहस्थिती पाहणे, ...

विपरीत राजयोग

Image
                                            विपरीत राजयोग    ▪️कुंडलीच्या फलादेशाचे वर्णन करताना, आपण कुंडलीचे बारा भाव, त्यांचे कारकत्व, तसेच रवि चंद्रादि 12 ग्रह, त्यांचे भावेशत्व,  त्यांच्या राशी, नक्षत्रे, अंश, नवांशगत स्थिती, त्या ग्रहावरील इतर ग्रहांच्या दृष्ट्या, त्यांनी इतर ग्रहांशी केलेले योग, याचा सर्वसाकल्याने विचार करून, आपण फलादेशापर्यंत पोहोचतो.       ▪️अचूक फलादेशासाठी, कुंडलीत जर काही विशिष्ट योग असले, तर त्यांची, ज्योतिषास सखोल माहिती असावी लागते. म्हणजे त्या योगाच्या संबंधित असणाऱ्या ग्रहांची, फल  देण्याची क्षमता किती आहे ? हे स्पष्टपणे लक्षात येते. 💢 उदाहरणादाखल, पंचमहापुरुष योग अमला योग, महाभाग्य योग, अधियोग  असे कितीतरी शुभयोग सांगता येतील.          त्याचबरोबर, केमदृम योगासारखे अशुभ  फलदाते, चांडाळ योग, अंगारक योग यासारखे, अंशत शुभ, अंशतः अशुभ फलदाते, असे अनेक विध योग आहेत.     ...

ज्योतिश्री पुरस्कार

Image
                      ज्योतिश्री पुरस्कार  💢  श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष्य संशोधन केंद्र, जळगाव च्या विद्यमाने, दि.8 व 9 जून 2021 रोजी संपन्न होणाऱ्या  " ज्योतिश्री अखिल भारतीय डिजिटल ज्योतिष्य अधिवेशनात " , मला , ज्योतिष्य क्षेत्रातील उत्तम व सखोल अभ्यासक म्हणून          ⚛️  "  ज्योतिश्री पुरस्कार   " ⚛️ मिळाला. 💢 मानपत्र व रोख रु.1000/-. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्था संचालिकेचे मनःपूर्वक आभार!               कार्यक्रमाची काही क्षणचित्रे ग्रहांकित मासिकातून

परदेश गमन व भाग्यस्थान.

Image
  परदेश गमन व भाग्यस्थान.        मूलतः कुंडलीचा अभ्यास सुरु होतो तो प्रथम स्थान -लग्नस्थान व लग्नेश या पासून. कारण प्रथम स्थानावरून जातकाची इच्छाशक्ती, कार्यप्रवणता, व कुंडलीतील इतर स्थानांची फळे ग्रहण करण्याची क्षमता अभ्यासता येते.        लग्न बलवान असता कुंडलीचा दर्जा उंचावतो.          कुंडलीतील नवम स्थान हे अत्यन्त शुभ स्थान असून हे या जन्मापुरते तरी, आपले संचित,  प्रारब्ध याचा कल दर्शवणारे स्थान आहे , या स्थानाच्या आधारे, जातक आपल्या जीवनात कोणत्या क्षेत्रात,  कितपत सफल होईल याचा अंदाज करता येतो.        भाग्येश मूलतः शुभ ग्रह असून तो कुंडलीत शुभ स्थानी, राशीं, अंशादि बलवान, अशुभ ग्रह दृष्टी विरहित,नवांशबली असता, अतिशय उत्तम असते.        तसेच भाग्यस्थानी असणारे ग्रह कोणत्या भावाचे स्वामी आहेत.? ते कारक आहेत कि अकारक,? राशीं अंश दृष्टया ते कशा स्थितीत आहेत ? हे पाहणेहि अगत्याचे असते.         या स्थानाचे कारक ग्रह, निसर्ग कुंडलीत, पंचम स्थानाचे अधि...