नेपच्यून बद्दल, थोडा स्पष्ट विचार.
💢 नेपच्यून बद्दल, थोडा स्पष्ट विचार.💢
💢 कष्ट स्थानात व अष्टम स्थानात जर नेपचून असेल तर, अनुक्रमे, अशी फळे सांगण्यात येतात.
💢 कष्ट स्थानी नेपच्यून असला, की पोटात विषारी पदार्थ जाण्याची शक्यता असते.
💢 दूषित अन्न सेवनामुळे सुद्धा, यांना वीषबाधा होऊ शकते. विशेषतः बुरशी आलेले पदार्थ, दुधापासून बनलेले पदार्थ यापासून, फूड पॉयझन होऊ शकते. एक्सपायरी डेट निघून गेलेली, औषधे घेतली गेलीत तरिहि, त्रास होऊ शकतो.
💢 अशा जातकाने कोणतेहि औषध घेण्यापूर्वी, त्याची एक्सपायरी डेट बघावी. अन्यथा अनुचित घटना होऊ शकते.
💢 परंतु आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, वर वर्णन केलेल्या केसेस, त्या मानाने कमी सापडतात.
💢 पण कुंडलीत, जातकाचा स्वभाव रागीट असल्यास, बुध मंगळ अशुभ स्थितीत, दृष्टी -युति योगात असता असता, एका टोकाची भूमिका घेण्याची प्रवृत्ती असल्यास, घरात वा कार्यालयात, मनाविरुद्ध काही परिस्थिती निर्माण झाल्यास, असे जातक, काही विषारी पदार्थ, हेतुपुरस्सर खाऊन, स्वतःचे जीवन, धोक्यात आणण्याची शक्यता असते.
💢 म्हणून, या नेपच्यूनचा विचार करताना, कुंडलीतील इतर ग्रहस्थिती पाहणे, अशा प्रकार ची, जातकाची मनोवृत्ती आहे काय ? याचा अंदाज घेणे फार आवश्यक ठरते.
💢 व जातकाचा स्वभाव जर , हट्टी दुराग्रही, मानसिक निराशा दर्शवणारा असेल, वा कुठल्या प्रकरणात अडकला असेल तर, हताश होऊन, हेतुपुरस्सर सुद्धा, अशा प्रकारची कृती, जातकाचे हातून होण्याचा संभव असतो.
💢 नेपच्यून हा भ्रमात ठेवणारा ग्रह आहे. तो जलग्रह व गूढाचा कारक असल्याने, जेव्हा तो अष्टमात येतो, अशावेळी, जर तो जलराशीत व क्रूर नक्षत्रात असेल तर, अशा जातकांना, पाण्या पासून भीती असते.
💢 त्यामुळे अनोळख्या तळ्यात, समुद्रात, नदीत पोहणे, यांनी टाळावे.
💢 अशा स्थळी, काही दुर्घटना झाल्यास, त्यांचा मृतदेह सुद्धा, लवकर सापडत नाही.
💢 काही कारणाने,असे जातक मरणासन्न अवस्थेत असता, बरेचदा, ते बेशुद्धावस्थेत वा कोमात असताना, मृत्यू येण्याची शक्यता असते.
💢 अशा अवस्थेत, केव्हा मृत्यू आला ? ही निश्चित वेळ कळणे सुद्धा, थोडे अवघड असते.
Comments
Post a Comment