एक लग्नदोष


💢 पती-पत्नीचे एक लग्न असेल तर  काय होऊ शकते ?   💢


पती पत्नीचे एक लग्न असता, काही ना काही तरी समस्या निर्माण होऊ शकतात.

 

विशेषतः संतती बाबत -


❇️  नाडी संदर्भात मत मतांतरे आहेतच.


❇️ जर नाडीदोष असेल तर आपसूकच,  ज्योतिष्याच्या डोक्यात,  संतती विषयक बलाबल पाहण्याची इचछा होते.

 

❇️ इतर योगहि संततीस बाधक दिसत असल्यास,  नाडीदोषाची गहनता,  अधिक स्पष्ट होते.

 

❇️ संततीचे बाबत, नाडी दोषाची जेवढी चर्चा केली जाते. तेवढी, एकलग्नदोषाची केली जात नाही. 


❇️ पती पत्नीचे एकलंग्न असता,  बरेचदा, अश्या समस्या येताना दिसतात.

 

❇️ बरेचदा पती पत्नीच्या वयात फार अंतर नसते. जर त्याच्या जन्मकाळी शनी, राहू, प्रजापती, नेपच्यून अश्या दीर्घकालीन पाप ग्रहाच्या युत्या वा दृष्टियोग असले, व  ते  एकलंग्न असल्याने, पंचमस्थानाशी निगडित असले, तर काय स्थिती होईल ? 


❇️ गुणमेलन करताना, एकाच्या पत्रिकेत असलेली उणीव, दुसऱ्याच्या पत्रिकेत असू नये,  या सिद्धांतालाच छेद बसेल. व  एकनाडी सदृश्य स्थिती, निर्माण होईल. 


❇️ या बाबत बरेच ज्योतिषी, एकलंग्न असणे,  चांगले समजतात. दोघांची  विचार प्रवृत्ती, सारखी असतें अशी भलावण करतात. पण वर लिहिल्यानुसार,  जर परिस्थिती निर्माण झाली, तर हा विचार किती पोकळ आहे, हें ध्यानी येईल.

 

 ❇️ संततीचे संदर्भात, मीं असे अनुभवले आहे कि, एकलंग्न असता, अश्या दीर्घ कालिन पाप ग्रहाच्या युत्या वा दृष्टीयोग ज्या भावात पडले त्या भावाची वाट लावल्यशिवाय राहत नाहीत.

 

❇️ अशा प्रकारच्या,  एक लग्नाच्या कुंडल्या,  गुण मेलना साठी विचारार्थ आल्यास,  याबाबत निश्चित विचार व्हावा. 


                   

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली