पंचांगाची महती व माहिती

 7️⃣

💢 पंचांगाची  - महती व माहीती 💢


∆ पूर्वापार, वर्षानुवर्षे ,एका पिढी पासून दुस-या पिढीत ,घराघरातून उपलब्ध असणारे एकमेव पुस्तक, म्हणजे पंचांग होय. पंचांगाचे अंतरंग पाहता "गागर में सागर " या शब्दात वर्णन करणे, अगदी योग्य ठरेल. 


∆ हिंदु धर्मातील संस्कार,  प्रत्येकाच्या मनात खोलवर रूजावेत, या करीता सण, व्रतवैकल्ये ,याची तारीखवार, व नैमित्तिक माहिती, प्रत्येकाच्या आवडीची ठरते. महिलांसाठी तर हा विषय, अधिक जिव्हाळ्याचा असतो. 


∆ पूजा -अर्चा, ग्रहांची उपासना, महत्वाचे मंत्र, बीज मंत्र आदि विषय ,आपसूकपणे, आपल्या मनावर ग्रहांचे महत्व व त्यांचा प्रभाव बिंबवतात. 


∆ ज्योतिष्यविषयक , प्रारंभिक माहीती देऊन पंचांग, नवागतांसाठी, पथप्रदर्शन करते. दैनंदिन लग्नसारणी, स्पष्ट चंद्र कसा काढता येईल?, दररोजचे सुर्योदय कालीन, ग्रहांच्या अंशाची कोष्टके ,ज्योतिष्यांना खूप मार्गदर्शक असतात.

 

∆ कुठला ग्रह वर्षभरात, केव्हा राशी बदल करेल ही माहीती, विवाहेच्छूकांना तर खूपच मोलाची ठरते. महापुरुषांच्या जयंत्या, यात्रामहोत्सवाच्या तारखा, वेगवेगळे मुहूर्त, अशा बहुविध विषयाचा संग्रह ,म्हणजे पंचांग होय. जणू काय, पंचांग म्हणजे विविध रंगी फुलांचा, गुलदस्ताच होय. 


∆ आजच्या संगणकीययुगात, वेगवेगळे साफ्टवेयर निघाल्याने, काही माहीती, झटपट मिळते खरी पण ,पंचांगाची ते बरोबरी करू, शकतील कां ? याबाबत शंका आहे. 


∆ साफ्टवेयर मध्ये ,एखादी तारीख टाकल्यास, केवळ त्या तारखेची माहीती मिळेल ,त्या दिवशीचे ग्रहमान मिळतील ,पण पंचांगात मात्र, एकेका पानावर, पूर्ण पंधरवाड्याची माहीती असल्याने, व दिनविशेष दिलेले असल्याने, संगणकापेक्षा अधिक माहीती मिळते. दग्धयोग ,यमघंट योगादि माहीती, साफ्टवेयर मध्ये मिळणार नाही. साफ्टवेयर मध्ये खग्रास -खंडग्रास ग्रहणांचा उल्लेख नसतो, पण पंचांगावरून हे मात्र तत्काळ लक्षात येते.   जन्मदिवशी ,खग्रास चंद्रग्रहण असता, व पत्रिकेत जर चंद्र दूषित झाला असेल, तर बालक, मंदबुध्दी वा मानसिक दृष्टया अपंग ,जन्माला येऊ शकते .जेव्हा कुंडली बनवितांना, पंचांगाचा आधार घ्याल ,तेव्हाच ही गोष्ट लक्षात येऊ शकते.साँफ्टवेअर मध्ये ते शक्य होत नाही.हा साँफ्टवेअर व पंचांगात लक्षणीय फरक आहे. 


∆  प्रत्येक प्रदेशात, एकेका विशेष पंचांगाचे, चलन पहावयास मिळते कारण, त्या पंचांगात दिलेली माहीती, त्या प्रदेशातील, एका प्रमुख शहरांच्या अक्षांश रेखांशावर, आधारित असते त्यामुळे, त्या प्रदेशात राहणा-या लोकांना ते, अधिक सोयीचे होते.

 

इतर शहरात जन्म झाल्यास ,त्या पंचांगावरून कुंडली काढतांना, वेळ संस्कारित करून घ्यावी लागते. 


∆ पंचांग म्हणजे कँलेंडर ,असाहि काहींचा गैरसमज असू शकतो. पण पंचाग ,कँलेडरपेक्षाहि ,आपले वेगळे अस्तित्व, सिध्द करते. 


∆ आज उपलब्ध असलेले पंचांग, त्यामानाने ,खूप प्रगत अवस्थेत आहे. मला एके ठिकाणी खूप जुने पंचांग पाहण्याचा योग आला. ते मोडीत छापलेले होते.त्यावरील शक इसवी सनात रुपांतर केले असता, ते सन 1858-59 चे आहे हे लक्षात आले. पंचांगाच्या शेवटच्या पानावर " हे पंचांग..... यांनी मुंबई येथे छापि  ले  " असा  शब्द तोडून, बखरी भाषेत, उल्लेख होता. पंचांगाची पाने पिवळीजर्द व निर्जीव झालेली होती. उलगडून बघतांना, त्यांचा तुकडा पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागत होती. शेवटच्या पानावर ,संक्रातीदेवीचे त्या पंचांगातील, एकमेव चित्र होते.


∆ पूर्वीच्या काळी ,पंचांगे, मोडी लिपीत प्रसिध्द होत असत.  त्यात दैनंदिन ग्रहाच्या माहीती व्यतिरिक्त, अन्य पूरक माहीती, काहीहि नसायची.  पंचांगात केवळ 7 ग्रहांचा उल्लेख असायचा. कालांतराने राहू- केतू चा समावेश झाला.अलीकडच्या काळात हर्षल ,नेपच्यून, प्लूटो यांची ,राशीनिहाय माहीती उपलब्ध होत आहे. त्यावेळी केवळ ,मराठी महीने, ताऱखांचा उल्लेख असायचा. नामाभिधान सुध्दा शक-संवता, आधारे केले जायचे. इसवी सन वा इंग्रजी महीने ,तारखा, यांना मज्जाव केला जाई. तिथि -नक्षत्रांचा समाप्ती काल, तर आता-आता पर्यंत ,घटका -पळात, छापलेला असे. पण आता बदलत्या काळाची गरज ओळखून,     सरलीकरणाच्या दृष्टीने, सर्व वेळा तास मिनिटात ,देण्यात येतात. 

असे हे बहुगुणी, बहुआयामी पंचांग प्रत्येक ज्योतिष्य प्रेमाच्या संग्रहात असलेच पाहिजे. 


∆ वर्ष संपले तरी त्या पंचांगाचे महत्व कमी होत नाही. संग्रहात ठेवल्यास, भूतकाळातील संदर्भाकरीता, ते सदैव मदतीस तयार असते.


                   

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली