पत्रिकेतील " द्विभार्या योग " 💢जेव्हा पत्रिकेत, ज्योतिषांकडे, विवाह विषयक प्रश्न विचारले असता, बरेचदा " द्विभार्यायोग " सांगितला जातो. तेव्हा, जातकाच्या मनात, चिंतेचे मळभ तयार होते. तो अतिशय चिंताग्रस्त होतो. अशा प्रकारच्या, बर्याचशा पत्रिका माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे, आलेल्या अनुभवानुसार, द्विभार्या योगाचे स्वरूप, कसे आहे ?, हे नमूद करणे, मला इष्ट वाटते. 💢 वरील विषय खूप गहन आहे. 💢 काही पत्रिकांमध्ये " द्विभार्या योग " असतो, जसा पुरुषांमध्ये असतो, तसाच तो स्त्रियांमध्येहि दिसून येतो. 💢 परंतु या योगाचे स्वरूप नीट समजून घ्यावे लागते. 💢 एखाद्या व्यक्तीने, तुम्हाला मनोमन वरले असेल व त्या व्यक्तीस तुम्हीहि मनोमन वरले असेल, परस्पराची पसंती, एकमेकांना कळली असेल, अशी स्थिती असून, जर पुढे त्यास यश आले नाही, तरी ते द्विभार्या योगात मोडते. किंवा 💢 विवाहा पूर्वी, वा क्वचित विवाहोत्तर, अशा प्रकारचे, अनैतिक संबंध सुद्धा, असू शकतात. 💢 या ठिकाणी, हे स्पष्टपणे नमूद करतो की, जीवनात कोणतीही घटना, मग ती शु...
💢 अष्टमस्थान व 64 वा नवमांश 💢 कुंडलीच्या 12 भावातील प्रत्येक स्थानांस एक आगळेवेगळे महत्त्व आहे . 6, 8, 12 त्रिकस्थानांपैकी , अष्टमस्थान हे एक अशुभ मानले जाणारे स्थान आहे . या स्थानापासून मृत्यूतुल्य संकटे , चिंता , आजार , गुप्तरोग , सासर , सौभाग्य , सदसद्विवेक बुद्धी , वारसाहक्काने धनलाभ , विना परिश्रमाची संपत्ती , अ कस्मात धनलाभ या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातात . या स्थानातून मिळणाऱ्या धनाचा स्त्रोत , मात्र अशुभ असतो . 💢 अशा या अष्टमस्थानाच्या महात्म्यामुळेच , अष्टमेश वा अष्टमस्थानात स्थित असलेल्या ग्रहांच्या दशा - अंतर्दशा जरा खडतरच जातात . 💢 या स्थानाचे कारकत्व शनि महाराजांकडे आहे . अष्टमात शनी असता, व्यक्ती दीर्घायुषी असते . फक्त तो बलवान हवा . हार्ट अटॅकच्या प्रसंगात , जर अष्टमात शनी असेल तर, पहिल्या अटॅकपासून बचाव होतो . अशा प्रकारच्या 2 /3 कुंडल्या माझ्या संग्रही आहेत . थोडक्यात, या शनीमुळे झटक्यात मरण न येता , बरेच दिवस बेडवर रेंगाळत राहून मरण य...
दि.7 जून 2022 ला, हॉटेल प्रेसिडेंट, पुणे येथील कार्यक्रमात ही कुंडली आपण अभ्यासार्थ घेतली होती. परंतु तिचे विश्लेषण वेळे अभावी पूर्ण होऊ शकले नाही. ती कुंडली आता विडिओ द्वारे विवेचन करीत आहे. विवेचनाच्या ओघात 1/2 ठिकाणी शाब्दिक चुका झाल्या आहेत. वाचकांनी मतितार्थ समजून घ्यावा ही नम्र विनंती 🙏🌺
Comments
Post a Comment