जन्मकुंडलिची मांडणी
💢फलादेशात अचूकता येण्यासाठी जन्म कुंडलीची मांडणी कशी करावी?💢
◾️ कोणत्याहि कुंडलीची ग्रहस्थिती पूर्णपणे समजल्याशिवाय,आपल्याला तो ग्रह काय व कसे फळे देईल? याचा अंदाज येत नाही.
◾️ त्यामुळे कुंडलीतील ग्रहांची योग्य प्रकारे स्थिती समजण्यासाठी, काही अनुभवजन्य मार्गदर्शनपर, टिप्स देत आहे.
💠 जन्म कुंडलीच्या भोवती, त्या प्रत्येक भावाशी संबंधित असणारे, अष्टक वर्गातील गुण लिहावे. यामुळे तो भाव कितपत बलवान आहे, याचा अंदाज येतो.
💠 जन्म कुंडलीची मांडणी करताना, तो ग्रह त्या राशीत, किती अंशावर आहे हे स्पष्टपणे कळण्यासाठी त्या ग्रहाच्या डोक्यावर त्या ग्रहाचे अंश लिहावे. हे अंश लिहिल्यानंतर, तो ग्रह नेमका कोणत्या नक्षत्रात आहे? हे आपल्याला स्पष्टपणे कळते. ( याकरिता पंचांगातील अवकडहाचक्रा नुसार कोणत्या राशीत, कोणती नक्षत्र येतात, याचा सराव केला पाहिजे ). यामुळे काही ग्रहांचे अंशात्मक युतीयोग व दृष्टीयोग असतील तर,त्याची फळे किती प्रबळ मिळतील, याचा अंदाज येतो उदाहरणार्थ या कुंडलीत शनि 22 अंशावर व मंगळ 29 अंशावर आहे. म्हणजे या युतीची फळे प्रभावीपणे मिळतील.
💠कुंडलीचे जन्म लग्न, किती अंशावर आहे ते लिहिणे पण महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ दिलेल्या कुंडलीत सिंह लग्न 25 अंशावर येते.
💠 एखादा ग्रह वक्री असता, चित्रात दाखवल्याप्रमाणे, त्या ग्रहाच्या खालील विशिष्ट खूण करावी. उदाहरणार्थ शनि, प्लुटो, राहू, केतू
💠 एखादा ग्रह जर नवांश कुंडली पाहून वर्गोत्तम ठरत असेल तर, त्याखाली = असे चिन्ह करावे. म्हणजे त्याचे बळ सहजपणे लक्षात येते .उदा.( या कुंडलित कोणताही ग्रह वर्गोत्तम नसल्यामुळे त्या चिन्हाचा वापर केला गेला नाही )
💠 एखादा ग्रह जर अस्तंगत असेल, तर त्या भोवती वर्तुळ करावे. उदा. बुध
💠 एखादा ग्रह क्रूर नक्षत्रात आढळल्यास, त्याखाली काळा बिंदू द्यावा. उदाहरणार्थ - प्रजापती, केतू, नेपच्यून.
💠 एखादा गृह जर नपुसक नक्षत्रात असेल तर, त्याखाली विशिष्ट खूण करावी. उदाहरणार्थ बुध, नेपच्यून ( मूळ मृग व शततारका हे नक्षत्र नपुसक मानली जातात )
💠 एखादा ग्रह जर पुष्कर नमांशात असेल तर, त्याखाली विशिष्ट खूण करावी उदाहरणार्थ या कुंडलित बुध व चंद्र पुष्कर नवांशात आहेत .
💢 मी वर निवडलेल्या खुणा, सर्वांनीच निवडाव्या असा आग्रह नाही. आपण आपल्या सोयीनुसार, प्रत्येक प्रकारासाठी, आपल्या आवडीप्रमाणे, खुणा निवडू शकता. मात्र एकदा निवडलेल्या खुणा, प्रत्येक कुंडलीचा अभ्यास करताना, पूर्वी ज्या निवडल्या आहेत, त्याच वापरल्या पाहिजेत. त्यात जर बदल केला, तर आपलाच गोंधळ होऊ शकतो.
💢 अशाप्रकारे चिन्हे वापरुन, जर आपण कुंडलीची मांडणी केली, व आपला वैदिक ज्योतिष शास्त्राच्या सिद्धांताचा, उत्तम अभ्यास असल्यास, प्रत्येक ग्रह, भाव,काय संकेत देतात हे स्पष्टपणे लक्षात येते . थोडक्यात कुंडली आपल्याशी "बोलायला" लागते.
= पुंडलिक दाते,अकोला
Comments
Post a Comment