जुळ्या संतती योगाचे जातक
💠 एकदा विवाह झाल्यानंतर, संतती होणे अपरिहार्य असते. किंबहुना, संतान प्राप्ति हीच सफल विवाहाची फलश्रुती आहे, असे मानले जाते.
💠 काही दाम्पत्यांना, सहजपणे संतती होते, तर काहींना थोडी वाट पाहावी लागते, कधी कधी काहींना सर्वं मुले अथवा सर्व मुलीच होतात. काहींच्या नशिबात संतती सुख नसते. तर काहींना एकाच वेळी दोन संतती प्राप्त होतात. संतती सुखाची त्यांच्यावर मेहेर नजर असते.
💠 संतान प्राप्ति हा पती-पत्नी पैकी, एकाच्या ग्रह योगावर अवलंबून नसून, पती-पत्नी दोघांच्याही ग्रह योगांचा संयुक्त परिणाम असतो.
💠 जुळी संतती होण्यासाठी कोणते ग्रहयोग कारणीभूत असतात.? त्या ग्रह योगाचे विवेचन आपण या अगोदरच्या व्हिडिओत केलेले आहे.
💠 या भागात आपण, ज्या जातकांना/ पालकांना जुळी संतती झाली आहे, अशा पालकांच्या, जन्म कुंडल्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याकरता आपण दहा कुंडल्या विचारार्थ घेतल्या आहेत.
💠 हा व्हिडिओ पाहताना, आपल्या प्रकर्षाने लक्षात येईल की, जुळ्या संततीसाठी ज्या ज्या ग्रह योगाची आवश्यकता असते, त्यातील बहुतांश योग, पती व पत्नी यांच्या कुंडल्यातून, दिसून येतात. हे ग्रहयोग एकदा पाठ झाल्यानंतर, आपण कोणत्याही पत्नी पत्नीच्या कुंडल्यांच्या आधारे, त्यांना जुळी संतती होईल काय? याबद्दल आपले मतप्रदर्शन करू शकतो.
💢 माझ्या सर्व ज्योतिष्यविषयक लेख, व काही मार्गदर्शन पर व्हिडिओज, माझ्या ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध आहेत.
https://hakhelnashibacha.blogspot.com
Comments
Post a Comment