⚛️ परिणाम गोचर ग्रहांचा ⚛️
💢आपली मूळ जन्म कुंडली, खूपच महत्त्वाची असते. आपल्या कुंडलीत काही शुभ, तर काही अशुभ, असे ग्रहयोग असतात. व त्यावरून, ज्योतिषी पुढे काय घडेल? याचा अंदाज वर्तवितात.
💢पत्रिकेतील हे योग, ग्रहांचा स्वभाव, कुंडलीतील कुठल्या भावाचे ते स्वामी आहेत,? ते कोणत्या भावात विद्यमान आहेत,,? ते कोणत्या ग्रहांशी शुभयोग/ अशुभ योग करतात.?याचा राशी,- अंश-, नक्षत्रनिहाय विचार केला जातो व त्यावरून, हे अंदाज वर्तविले जातात.
💢आयुष्याच्या पुढील काळात, मूळ कुंडलित जे ग्रहयोग आहेत, ते जेव्हा गोचरने तसा योग घडवतात, त्यावेळेला, त्या ग्रह योगांचा परिणाम मिळण्याची संभावना असते. 💢 शुभ योगांचे शुभ परिणाम मिळतात, तर अशुभयोगाचे अशुभ परिणाम मिळतात.
💢 यात अट एकच. आपली जन्म दिनांक, जन्म वेळ, व जन्मस्थळ, हा तपशील तंतोतंत खरा असला पाहिजे.
💢याच संदर्भात, आपण अभ्यास म्हणून, खालील कुंडली निवडली आहे
माझा ब्लॉग https://hakhelnashibacha.blogspot.com
= पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न, अकोला -9421755299
Comments
Post a Comment