Posts

Showing posts from November, 2020

प्रभाव अष्टम स्थानाचा

Image
प्रभाव अष्टम स्थानाचा  :   ▪️  जन्मकुंडली हा एक असा रहस्यमय नकाशा आहे,  कि मानवी जीवनातील सर्व रहस्ये, व सम्भाव्य घडामोडी ह्या, भाव,  ग्रह, राशीं, नक्षत्रांच्या माध्यमातून,  सांकेतिक भाषेत,  त्यात  लिहिलेल्या असतात.  ▪️ अट एकच,  कि आपली जन्म तारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ ही माहिती,व त्या माहितीच्या आधारावर  बनविलेली,  आपली कुंडलीही बिनचूक असावी.   ▪️माझे भावी जीवन कसे असेल ? मी कोण होईल ?, मला नावलौकिक मिळेल कां ? अशा अनेक प्रश्नांची मालिका,  मनाच्या पडद्यावर, सुरु होते.     ▪️ आर्थिक स्थिती कशी राहील ?,  असे वाटणे,  स्वभाव सुलभच म्हणता येईल.   ▪️ मनुष्याच्या जीवनात, पैसा म्हणजे सर्व काही, असे नसले तरी,  पैशाला खूप महत्व आहे, हे ना कबूल करून चालणार नाही.  ◾️कुंडलीच्या माध्यमातून,  आर्थिक प्राप्ती दर्श वणारे भाव,  प्रामुख्याने,  द्वितीय भाव, पंचम भाव, अष्टम भाव, लाभ भाव  म्हणता येतील.   ◾️द्वितीय भाव,  हा वडिलोपार्जित संपत्ती दर्शक, पंचम भाव हा ...

कारावास योग -उत्तरार्ध

Image
  . ( पूर्वसूत्र : कारावास  योग याच ब्लाँगवर  दि. 5 ऑक्टोबर 2020 रोजी प्रकाशित झाला आहे. )  .. कारावास योग - उत्तरार्ध  ▪️ कारावास योगाचे खरे स्वरूप काय ?, याबद्दल,  आलेल्या स्वानुभवानुसार, " भविष्य दर्पण " च्या, सप्टेंबर 2020  च्या  अंकात कारावास योगाचे स्वरूप,  विशद केले आहे. तो लेख या ब्लाँगवर 5 ऑक्टोबर 2020 या दिवशी प्रसारित केला आहे. वाचनात सुसूत्रता यावी म्हणून, आपण तो वाचू शकाल.  ▪️ " कारावास योग " म्हणजे,  तुरुंगात जाणे, हा सरळ -सरळ अर्थ असला,  तरी त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती,  वा अजाणते पणी गुन्हा होणे,  किंवा गुन्ह्यात अडकणे,  वा कुणीतरी अडकवणे, अशी सबळ कारणे असावी लागतात. त्यामुळे,  तशा प्रकारचे योग कुंडलीत आहेत की काय ?  याचा पडताळा घेणे जरुरी असते. ▪️ तसे काही कुंडलीतून न आढळल्यास,  जर काही ग्रह, " कारावास योग " सांगत असतील,  तर मात्र  तो योग , आरोग्य विषयक काही समस्या निर्माण होऊन,  हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची,  पाळी आणू शकतो. ▪️ याबद्दल आपण मागील अंकात स...

ज्योतिष्य अभ्यासक कसा असावा ?

Image
  ज्योतिष्य अभ्यासक कसा असावा ?   ( हा लेख, ज्योतिष्य क्षेत्रातील,  नवोदितांसाठी आहे )  ∆ ज्योतिष्य हे " गूढ शास्त्र " मानले गेले आहे. गूढ शास्त्रात, अजूनहि बरीच शास्त्रे, अंतर्भूत होतात. पण अतिशय सात्विकवृत्ती, परोपकार , जन कल्याणाची भावना तीव्र असून, जर दैवात  योग असतील, तरच या शास्त्रात रूचि निर्माण होते. तसे असल्यास,योग्यमार्गदर्शनहि सहजासहजी उपलब्ध होते. स्वभावतः जागृत झालेली उत्कंठा, जिद्द, चिकाटी, ज्ञानपिपासा या सर्ववृत्ती, मदतगार ठरतात. हे सर्व नशीबात असते, तेव्हाच घडते अन्यथा, ज्योतिष्याची पुस्तके घरात असून सुध्दा, धूळ खात पडतात. वा पुस्तक हाती घेतल्यावर,5 मिनिटात निद्रास्थिती प्राप्त होते. ∆ " शास्त्र " व " शस्त्र " या दोन शब्दात ,एका मात्रेचा फरक असला तरी, हे परस्पर संबंधित आहेत. थोडक्यात, शस्त्र कसे धारण करावे ?, त्यात निपुणता कशी प्राप्त करावी ?, त्याचा वापर कुठे व कसा करावा ? , त्यास अद्यावत कसे ठेवावे ? या संबंधीचे, पूर्णज्ञान ,म्हणजे शास्त्र म्हणता येईल. पिढ्यानपिढ्या, हे ज्ञान अंमलात आणून ,त्याची उपयोगिता सिध्द केली जाते तेव्हा, ते सर्...

शल्यक्रियेद्वारा प्रसूतीसाठी- मुहूर्ताचे योगदान

Image
  4️⃣7️⃣  💢 शल्यक्रियेद्वारा प्रसूतीसाठी-  मुहूर्ताचे योगदान 💢 ," शुभमहुर्त पाहून, सिजेरिन डिलीव्हरी करणे,  जातकाची कुंडली (ग्रहयोग) कितपत योग्य ठरणार ? " 💢 शुभमुहूर्त पाहून, शल्यक्रियेद्वारा बाळाचा जन्म करवून घेणे,कितपत योग्य राहील ? यासंबंधी मत प्रदर्शनास वाव देणारी पोस्ट,  एवढ्यात वाचनात आली.. 💢 अर्थातच, या विषयात ,  चिंतनाचा भाग अधिक विस्तृत असल्याने, स्वतंत्र लेखच लिहावा, अशी इच्छा निर्माण  झाली . 💢 वैद्यक शास्त्राचा असा सिद्धांत आहे कि, उत्तम ( व प्रामाणिक ) शल्य चिकित्सक सुद्धा,  मौखिक औषध योजना करून  जर,  रोग्याचे आजार बरे होणार असतील तर, शस्त्रक्रियेस उत्तेजन देत नाहीत . दुसऱ्या शब्दात, याचाच अर्थ असा की, अगदी निकड असल्याशिवाय, शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात नाही. 💢 हेच तत्व, बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेसही लागू होते. बाळंतपण जर अतिशय गुंतागुंतीचे असेल,  तरच असा निर्णय घेतला जातो. मेडिकल क्षेत्रातील अतिशय प्रगत ज्ञान, जनमानसात त्याची रुजलेली जाणीव, यामुळे, गर्भ राहिल्याचे कळताच, नियमित रुटीन टेस्ट असल्याने, गर्भ ...

ध" चा "मा" कसा होतो ?

Image
  "ध" चा  "मा" कसा  होतो ?              ✴️ बरेचदा काही लोक मोठ्या धर्मसंकटात असतात. त्यांचे म्हणणे असे असते कि, माझ्या एका मुलाचे जन्मनाव एके ठिकाणी विचारले, तर त्यांनी एक नाव व राशीं पण सांगितली, आमच्या सासूबाई नी  त्यांच्या ओळखीच्या ज्योतिष्याना  विचारले, तर त्यांनी वेगळेच जन्मनाव व राशीं सांगितली. यातून खरे कुणाचे मानायचे ?  एका व्यक्तीस 2 जन्मनावे असतात काय ?. त्यांचा हा प्रश्न स्वभाव सुलभ असतो . ही समस्या बरेच जातका च्या बाबतीत दिसून येते.        ✴️ यात सहसा 2 शक्यता असतात.  एक म्हणजे, जातकाचा जन्म बहुदा  उत्तररात्रींचा असतो व नेमकी जन्मवेळ सांगताना, 11 तारखेस गुरुवारी रात्री 12:30 वाजता अशी सांगितली जाते. वास्तविक, रात्री 12 नंतर तारीख बदलते. त्यामुळे ती जन्मवेळ, खरी 12 तारीख व 00:30 अशी नोंदवायला हवी. व अधिक गोंधळ टाळण्यासाठी, उजाडणारा वार शुक्रवार होता, अशी पुस्ती जोडावयास हवी.  जातकाच्या पालकांना, अशा संभाव्य गोंधळाची कल्पना नसल्यास,  ज्योतिष्यानी, त्यांना ते ...

जन्मकुंडली व चार पुरुषार्थ

Image
  जन्मकुंडली व चार पुरुषार्थ   🔆 जन्म कुंडली म्हणजे काय ?   कुंडलीचे स्वरूप सांगताना, कुंडली म्हणजे, आपल्या जन्माच्या वेळी, ग्रहांची असलेली आकाशस्थ स्थिती, दर्शवणारा नकाशा होय. असे सीमित शब्दात वर्णन केल्या जाते. व जेव्हा आपण कुंडलीचा अभ्यास करावयास लागतो, तेव्हा या  12 भाव, 12 ग्रह, 12 राशीं, व त्यात अंतर्भूत असलेली 27 नक्षत्रे, यातून विविध छटा तयार होताना दिसतात.       🔆 जसे एखाद्या रत्नास पैलू पाडले असता, त्यातून प्रकाश किरणे परावर्तित होऊन,  वेगवेगळ्या छटा निर्माण होतात.  तसेच कुंडलीच्या माध्यमातून, भावी जीवनातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील, चढ- उतारांचा, आपल्याला आभास व्हावयास लागतो. व जसजशी, आपली अभ्यासात गती वाढत जाते, तसतसे आयुष्यातील भावी घटनांचे अंदाज, अधिक स्पष्ट होत जातात. व कुंडली ही केवळ एक चौकोन नसून, कुंडली म्हणजे " गागरमें सागर है !" असे म्हणावे लागते  .       🔆 धर्म, अर्थ, काम, मोक्ष   हे चार पुरुषार्थ आहेत,  हे मंदिरातील कथा- कीर्तनांत, प्रवचनात, ऐकलेले असते पण ते कु...