Posts

Showing posts from August, 2020
Image
  6️⃣1️⃣ ©️💢 ओळख सप्तम भावाची , 💢 काम त्रिकोणी,  "मध्य भाव ", सप्तम भाव, त्याचे नाव, सर्वभावे, "मध्य " भाव, जायास्थान तें, माझेच नाव  !! 1 !! बाल, तारुण्य आणि जरा, जीवनाचा हा, नियम  खरा, इथेही मजला,  "मध्य "मान, मीच पल्लवी, काम -यौवन  !! 2 !! पुष्पांमध्ये,  जेवी पराग, " मध्य " वर्ती, कोमल भाग, मानव काया, तत्सम जाणा, देह -"मध्या",  विषय वासना,  !! 3 !! जाया सुखाचे, मीच आगर, कसा असेल तो, जोडीदार ?, भेटेल उशिरा ? , कां लवकर, ? रचित विवाह ? ,  कां स्वयंवर ? !! 4 !! स्वरूप त्याचे, कसे असेल ? पटेल -टिकेल कां ? , नुसते खटकेल ? सकल, समूळ, शंकांची उकल, मजविण दुजा, कोण करेल ?  !! 5 !! रज -वीर्य अन, जनन क्षमता, राही सबल, मी शुभ असता, पितृ ऋण फिटे, वंश विस्तारी शुभत्व असता,  सुफले  सत्वरी   !! 6  !! दिवाणी दावे, कोर्ट कचेरी, जय पराजयाचा, मी मानकरी, अशुभ मी, असेल जरी, विषयसुखा, दूषित करी  !! 7 !! घरधनी असो वा, घरधनीण, सुपात्र असता, सफल जीवन, काय नेमके, आहे प्राक्तन ?, ग्रहसंकेत करी...
Image
  6️⃣0️⃣ ©️💢  ओळख षष्ठ भावाची    💢 मी आहे, स्थान षष्ट, नेमियले मज, द्यावया कष्ट, रोगराई, व्याधी, आजार, झोळी माझिया , भरपूर  !! 1 !! माझा  स्वामी,  कष्टेश, कष्ट द्याया, करी प्रवेश, वसेल  तेथे, बहू अडचणी, मिळतील फळे मग , उणी-दुणी  !! 2 !! जीवन -वसनी, दोनच धागे, सुख पुढे तर, दुःखहि  मागे, आधि -व्याधी, कुणा सुटेना, दशांतरी मग , होती यातना  !! 3 !! कर्ज पीडा ती,  राही उरी, मीच दावी,  शत्रू -वैरी, उदर,  कटी वर, माझी सत्ता, शूल पीडक मी, अशुभ असता  !! 4 !! अपघातादि, शल्यक्रिया, जाणावी ती, मम किमया, दास सुखाचा भावही, मी, मातुल सुखाचे, आगर मी  !! 5 !! . परि, दशमाचे मी, भाग्यस्थान, परिश्रमाचे, शुभ फल देईन, नोकरीं -चाकरी, माझे पायी, एकमेव गुण मज , भूषणदायी  !! 6 !!   
Image
  5️⃣9️⃣ ©️💢 ओळख पंचम भावाची 💢 लग्नानंतरचे  शुभ स्थान, मी असे , पंचम स्थान, कला, विद्या, संतती, मीच आहे,  अधिपती  !! 1 !!. सट्टा, जुगार, धनप्राप्ती, देणे असते,  मज हाती, पंचमेशा वरदान, असो कुणीही, बहुमान  !! 2 !! काव्य क्रीडा, साहित्य, शृंगार, सकल गुणांचा,  मी आधार, जव असेल मी,  दूषित विकल, कुक्षी प्रसवण्या,  होई  दुर्बल  !! 3 !! इष्ट देवता,  दावी पंचमेश, पूजा अर्चना, करा विशेष, शुभत्व असता, जातक गुणी, होई बहुमुखी,  प्रतिभा धनी  !! 4 !! असता अशुभ, विकल  मी, नव्हे यशाची,  कुठलीही हमी, पंचमासि  हा,  विशेष मान, मजला म्हणती, "यशस्थान " !! 5 !!

ओळख चतुर्थ भावाची

Image
  5️⃣8️⃣ ©️💢 ओळख चतुर्थभावाची   💢 सुखस्वामी मी, चतुर्थभाव, मातृस्थानहि,  माझेच नाव, वास्तू, वाहन, शेतीवाडी, याची मजला,  खूप आवडी  !! 1 !! मातृ प्रेम हे, कसे मिळेल ?, मजविण तुम्हा, तें कसे कळेल ? , शुभत्व असता, मातृ ममता , अशुभ असता, भासे न्यूनता  !! 2 !! शुभता मजला, असेल जरी, सर्व सुखे,  मिळतील खरी, छाती, हृदयी,  माझे नाते, दावी मीच, मातृसुखाते  !! 3 !! "श्री गणेशा " मी विद्येचा, आद्यगुरू, हा, मान आईचा, निद्रासुखहि माझे तनयी, नसता शुभ, हिरावून घेई  !! 4 !! जन्मस्थानी होई प्रगती, मम शुभता, तिचीच महती, अशुभ असता, येई प्रचिती, परदेशी मग, होई उन्नती  !! 5 !! अशुभाचा तर, अनुभव भारी, स्थावराची , कोर्ट कचेरी, मनःशांतीवर,  येईल  ताण, पैसा, शक्ती, -धूळधाण  !! 6 !!

ओळख तृतीय भावाची

  5️⃣7️⃣ 💢 ओळख तृतीय भावाची   💢 मी आहे तृतीय भाव,  बंधुभावहि,  माझेच नाव,  धैर्य, पराक्रमे , मी परिचायक, छंद, चिकाटी, अक्षर दर्शक  !! 1 !! बंधू -शेजार, सुखाचा स्वामी, हात -कान, उजवा, दर्शवी मी, प्रवास छोटे घडविण्यासि, माझी करावी, खोल चौकशी  !! 2 !! जीविके साधनी, पहावे मजला , शुभस्थिती असता, संतोष मनाला , अशुभ असता, ढोर मेहनत, परि पराक्रमाचे, होई , " पानिपत  "!! 3 !! भाव -भावेश जव,  शुभ सर्वत्र, बंधू सुख जणू, राम -सौमित्र, अशुभ असता, मी सर्वही, बंधू, बंधुला , पाण्यात पाही,  !! 4 !! मी, अष्टमाचे, अष्टमस्थान, या काजे, मज,  अशुभ मान, उपाय यासी,  काही नसे, असता प्राक्तनी, अजब ठसे  !! 5 !!

ओळख द्वितीय भावाची

Image
  5️⃣6️⃣ 💢 ओळख द्वितीय भावाची  💢 मी आहे,  धनभाव, घेई नित्य, धनाचा ठाव, वाणी, वाचा, खानपान, दर्शविण्या मज, बहुमान !! 1 !! . नेत्र -कंठी, माझी सत्ता, स्वरूप सुंदर, मी शुभ असता, "धनेशा ", माझा स्वामी म्हणती, असेल तेथून, " लक्ष्मीप्राप्ती "!! 2 !! शुभ ग्रह माझे, ठायी असता, धनाची कुठलीच, नसावी चिंता, मधुर - विनयशील,  वाचा राही, " तोंड गोड, " तर,  सर्वच काही !! 3 !! पापप्रभावी, जर असेल मी, अभक्ष्य भक्षी, अपेयप्रेमी, क्रूर -उग्र अशी, वाचा असे, कटू वचनी,  तुटती माणसें !! 4 !! शब्द हे रत्न, शब्द हे धन, त्रिकालाबाधित, हे संतवचन , धनसंग्राहक, हा मम  बहुमान, अन्य नाम,  तें, कुटुंब स्थान !! 5 !! पैसा हे धन, ! शब्द हेही धन, ! संग्रह दर्शन ! काम माझे !!

ओळख प्रथम भावाची

Image
  5️⃣5️⃣ 💢 ओळख प्रथम भावाची 💢 मी असे, प्रथम भाव,  "लग्नभाव" हे,  टोपण नाव,  बिरुद माझे,  त्रित्रिकोण,  सर्व भावे मज , अग्रमान  !! 1 !! माझा स्वामी, दर्शवी राशीं,  कुठल्या भावी ?, करा चौकशी,  कुठल्या राशीत ? , कोणत्या अंशी ? ,  कुणाची दृष्टी ? , युति कुणाशी ?  !! 2 !! माझे अंगी, असती कोण ?,  बघा तयांना,  त्यांचे गुण,  फल मी देई, शुभ की न्यून? ,  सर्वस्वी त्यावर, अवलंबून. !! 3 !! चारित्य्र, ठसा, व्यक्तित्व, प्रभाव,  हाच माझा,  स्थायी भाव,  देहमूर्ती व,  आरोग्यवृत्ती,  दर्शविणारा मी, अधिपती !! 4 !!  तनु, लग्न, स्व, मम,  बरीच नांवे,   आळविती सकल मज, मनोभावे,    लग्नस्वामी मग,  कुणीही असता ,    होई सदैव,  शुभफलदाता !! 5 !!