अंतरंग ग्रहयोगांचे

7️⃣1️⃣ 💢 अंतरंग ग्रहयोगांचे 💢 💢 पुरातन काळात ज्योतिष शास्त्र ही विद्या, गुरुकुलात, आचार्यांच्या माध्यमातून ग्रहण केली जात होती. हे विद्यार्जनाचे आद्य रूप होय. आजच्या काळात, वेगवेगळ्या शिकवणी वर्गाच्या माध्यमा तून, ज्योतिष शास्त्राचा बरचसा प्रचार व प्रसार दिवसेंदिवस होत आहे,ही या शास्त्रासाठी, गौरवाची बाब आहे. हे गुरुप्राप्तीचे आधुनिक रूप होय. 💢 ज्योतिष शास्त्र विषयक सर्व ग्रंथसंपदा हेहि , गुरुचे प्रतिरूपच आहे . ज्ञानार्जनासाठी आपण पुस्तकांचा पुरेपूर वापर करतो. एखादी बाब, आपल्याला नीट कळली नसल्यास, आपण ती वारंवार वाचतो. त्यावर मनन करतो. त्यामुळे जे ज्योतिष अभ्यासक आहेत, त्यांचे कडे ग्रंथसंपदा भरपूर असते. पण सर्व बाबी, केवळ वाचनावरून समजत नाहीत, ही या पद्धतीतील , एक मोठी त्रुटी आहे. आपल्याला काही शंका असल्यास, आपण ती पुस्तकांना विचारू शकत नाही. तसेच एखादा मुद्दा समजावून सांगताना, तो नीट आकलन व्हावा या हेतूने, बोलताना, शब्दावर जो दाब दिल...