Posts
ज्यो. वाचस्पती -प्रबंध विषयी
- Get link
- X
- Other Apps
*💢 ज्योतिष विद्यावाचस्पती परीक्षा- प्रबंध सादरीकरण विषयी 💢* नमस्कार! आपण सर्व ज्योतिष्यप्रेमी विद्यार्थ्यांनी, ज्योतिष्य अलंकार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन, आता ज्योतिष्य विद्यावाचस्पती परीक्षेसाठी प्रवेश घेतला आहे. ◾️ या परीक्षेसाठीही आदरणीय मॅडम द्वारा प्रसारित झालेले, निर्धारित अभ्यासक्रमावरील युट्युब वरील व्हिडिओ पाहून, मनन करून, चिंतन करून, नोट्स काढून, आपण अभ्यास करणार आहोत. ◾️ तसेच, अलंकार परीक्षा प्रमाणे या परीक्षेतहि *"प्रबंध"* या विषयाचा समावेश आहे. मात्र अभ्यासाचा सराव होण्यासाठी, काठिण्य पातळी वाढविल्यामुळे, या प्रबंधात 50 कुंडल्यांचा समावेश राहील. ◾️ प्रबंधासाठी आपल्याला एकूण पाच विषय दिलेले असून, प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या याप्रमाणे 50 कुंडल्यांचा प्रबंध तयार करावयाचा आहे. तसेच हा प्रबंध, प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी, परीक्षा हॉलवर, आदरणीय मॅडमना सादर करावयाचा आहे. ◾️ या प्रबंधासाठी *(1) प्रेम प्रकरण व त्यातून विवाह (2) कर्करोग (3) संतती योग (4) व वैधव्य / विधुर योग (5) परदेश गमन योग* असे पाच विषय राहणार आहेत. त...
ज्यो. अलंकार परीक्षा -प्रबंध
- Get link
- X
- Other Apps
*💢 ज्योतिष्य अलंकार परीक्षा - प्रबंधाविषयी 💢* नमस्कार! श्री ज्योतिष्य संशोधन केंद्राच्या विद्यमाने, आपण सर्व विद्यार्थी ज्योतिष प्रवीण, विशारद,भास्कर या यशस्वीपणे परीक्षा देऊन, आता ज्योतिष्य अलंकार या परीक्षेचे परीक्षार्थी आहात. या परीक्षेच्या अभ्यासक्रमा नुसार, युट्युब वरील आदरणीय मॅडमचे व्हिडिओ, पाहून, मनन करून, त्यावरून नोट्स काढून, आपण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोतच. यावेळी आपल्याला प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन, परीक्षा द्यावयाची आहे. तसेच या परीक्षेची, यापूर्वीच्या परीक्षेच्या तुलनेत काठिण्य पातळी वाढलेली आहे. ◾️या परीक्षेत प्रबंधाचा समावेश असतो. या प्रबंधात एकूण 10 कुंडल्या असून आपल्याला, त्यांचा जन्मकुंडली, चंद्र कुंडली, नवांश कुंडली, जर त्या कुंडली धारकाच्या जीवनात जर काही समस्या असेल, तर त्या समस्येचा उकल करणारी, तत्सम वर्ग कुंडली, अष्टक वर्ग, याप्रमाणे अभ्यास करावयाचा आहे. ◾️आतापर्यंत शिकलेल्या ज्योतिष शास्त्रीय सिद्धांताचा उपयोग, तसेच, अलंकार परीक्षेच्या अभ्यासक्रमातून शिकलेले सिद्धांत, याचे निकष वापरून, आपल्याला ह्या 10 कुंडल्या सोडवावयाच्या...
ज्यो. रत्न प्रबंध विषयक सूचना
- Get link
- X
- Other Apps
💢 ज्योतिषरत्न परीक्षेसाठी निर्धारित केलेले प्रबंधाचे विषय 💢 1 कोर्ट केस 2.नि: संतान योग.( पती-पत्नी दोघांच्या कुंडल्या असता, त्या दोन कुंडल्या समजल्या जातील ) 3.परित्यक्ता ( ज्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला नाही, परंतु विभक्त राहतात ) योग 4.ऑपरेशन योग. 5.त्वचा विकार 6. अविवाहित व्यक्ती 7.घटस्फोटीत / घटस्फोटीता वरील सात विषयांपैकी कोणतेही पाच विषय आपल्याला निवडता येतील. व प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या, याप्रमाणे एकूण 50 कुंडल्याचा प्रबंध, प्रत्यक्ष परीक्षासमयी सादर करावयाचा आहे . हे सर्व विषय, सर्व सामान्य जातकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे, कुंडलीतील ग्रहमान व विषयाशी संबंधित ग्रहस्थितीचे सविस्तर विवेचन असणे आवश्यक आहे. ◾️ कुंडलीतून दिसणाऱ्या जातकाच्या जीवनातील इतर विविध घटनांपेक्षा, प्रबंधाचा जो विषय आहे. त्या घटनेवर, सांगोपांग मुद्देसूद लेखन करावे. जन्म कुंडली, चंद्र कुंडली, नवाश कुंडली, संबंधित वर्ग कुंडली, घटना जर एखाद्या विशिष्ट दिवसांशी संबंधित असेल तर, त्या दिवशीची गोचर कुंडली, अष्टक वर्ग, या सर्व घटकांचा विवेचनाच्या ओघात स...
जन्मकुंडलिची मांडणी
- Get link
- X
- Other Apps
💢फलादेशात अचूकता येण्यासाठी जन्म कुंडलीची मांडणी कशी करावी?💢 ◾️ कोणत्याहि कुंडलीची ग्रहस्थिती पूर्णपणे समजल्याशिवाय,आपल्याला तो ग्रह काय व कसे फळे देईल? याचा अंदाज येत नाही. ◾️ त्यामुळे कुंडलीतील ग्रहांची योग्य प्रकारे स्थिती समजण्यासाठी, काही अनुभवजन्य मार्गदर्शनपर, टिप्स देत आहे. 💠 जन्म कुंडलीच्या भोवती, त्या प्रत्येक भावाशी संबंधित असणारे, अष्टक वर्गातील गुण लिहावे. यामुळे तो भाव कितपत बलवान आहे, याचा अंदाज येतो. 💠 जन्म कुंडलीची मांडणी करताना, तो ग्रह त्या राशीत, किती अंशावर आहे हे स्पष्टपणे कळण्यासाठी त्या ग्रहाच्या डोक्यावर त्या ग्रहाचे अंश लिहावे. हे अंश लिहिल्यानंतर, तो ग्रह नेमका कोणत्या नक्षत्रात आहे? हे आपल्याला स्पष्टपणे कळते. ( याकरिता पंचांगातील अवकडहाचक्रा नुसार कोणत्या राशीत, कोणती नक्षत्र येतात, याचा सराव केला पाहिजे ). यामुळे काही ग्रहांचे अंशात्मक युतीयोग व दृष्टीयोग असतील तर,त्याची फळे किती प्रबळ मिळतील, याचा अंदाज येतो उदाहरणार्थ या कुंडलीत शनि 22 अंशावर व मंगळ 29 अंशावर आहे. म्हणजे या युतीची फळे प्रभावीपणे मिळतील. 💠कुंडलीचे जन्म लग्न, किती अंशावर आह...
विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टिप्स -2
- Get link
- X
- Other Apps
💢विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टिप्स -2💢 आजच्या काळात प्रत्येकास मोबाईल वापरणे ही काळाची गरज ठरलेली आहे. मोबाईल का माध्यमातून बरेचदा आपल्याला इतरांना संदेश द्यावे लागतात. मातृभाषेतून आपल्या भावना आपले विचार प्रभावीपणे प्रगट होत असतात. परंतु असे निदर्शनास येते की बऱ्याच लोकांना देवनागरीतून लिहिणे हे कठीण जाते त्यामुळे येथे मराठीतून लिहिताना रोमन लिपीचा वापर करतात. एखादे दुसरे वाक्य असेल तर ते वाचणाराला तेवढे अवघड जात नाही. परंतु फार मोठा परिच्छेद असेल तर, वाचणाराला त्याचा अर्थ लवकर कळत नाही. व ते वाचन त्रासदायक ठरते. ◾️ ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना, आपल्याला मातृभाषेतून ऑनलाईन पेपर सोडवावे लागतात. तसेच ज्योतिष्य अलंकार, ज्यो. वाचस्पती,ज्योतिष रत्न या वरिष्ठ श्रेणीच्या परीक्षांमध्ये, प्रबंधाचा समावेश आहे. प्रबंध म्हणजे थोडक्यात, कुंडलीचे संपूर्ण विवेचन असे म्हणता येईल. ◾️हे प्रबंधाचे विवेचन आपल्याला मातृभाषेतून करावयाचे असते. अशा वेळेला जर आपल्याला मराठी टंकलेखन येत नसेल तर, अडचणी येतात, आपल्याला अवघडल्यासारखे होते. आपल्या या समस्येवर एक उत्तम समाधान आहे. ◾️ गु...
महत्वाच्या टिप्स
- Get link
- X
- Other Apps
💢 सर्व ज्योतिष्य अभ्यासकांना मार्गदर्शनपर महत्त्वाच्या टिप्स 💢 ज्योतिष शास्त्र हे इतर शास्त्रांपेक्षा जरा वेगळे आहे. दैवी संकेत असल्याशिवाय या शास्त्राची आवड वा त्याचा अभ्यास करण्याची लालसा मनुष्यात निर्माण होत नाही. आपण सर्व या क्षेत्रात आलोत, हा दैवाचा कौलच म्हटला पाहिजे. बरेच विद्यार्थी, आपला व्यवसाय -नोकरी सांभाळून या क्षेत्राचा अभ्यास करतात. त्यांना अभ्यासात सुलभता यावी, सरलता यावी म्हणून काही अनुभवजन्य टिप्स, मी या लेखाद्वारे देत आहे. ◾️ कोणतीही कुंडली काढताना, तिची मांडणी करताना, कुंडलीच्या नकाशाचे चित्र काढणे आवश्यक असते. बरेचदा, आपण घाईत असतो तो त्यामुळे ती आकृती प्रमाणबद्ध येत नाही. व आपल्याला, फलादेशासाठी,आयुष्यात बरेचदा ह्या आकृत्या काढाव्या लागतात. यासाठी, जर आपण एका विशिष्ट आकाराचा, रबरी शिक्काच बनवून घेतला तर, ही आपली समस्या दूर होते. रबर स्टॅम्प व इंक पॅड याचा खर्च, एकदाच होतो. परंतु, दरवेळेला आपल्याला आकृती काढण्याची जरूर पडत नाही. याची निकड ओळखून मी स्वतः साडेचार सेंटीमीटर बाय साडेचार सेंटीमीटर या आकाराचा, एक रबरी शिक्काच बनवून घेतला आहे. फक्त याश...