चंद्र नभीचा मनी अवतरे

" चंद्र नभीचा मनी अवतरे " ❇️ ज्योतिष शास्त्रात रविला ग्रहमंडळातील राजपद बहाल केले गेले आहे. तर चंद्रास प्रधान मानले आहे. रवि व चंद्र हे ग्रहमंडळातील प्रमुख ग्रह आहेत, म्हणूनच कि काय ? आठवड्यातील वाराच्या नामाभिधानात, रवीचा प्रथम व तदनंतर, चंद्राचा वार येतो. ❇️ चंद्राच्या या महत्वामुळेच जन्मकुंडली नंतर, लगेच चंद्रकुंडली मांडण्यात येते. जन्मस्थित चंद्रास, कुंडलीच्या प्रथम स्थानी घेऊन बाकी ग्रहांची राशीनुसार मांडणी करून, चंद्रकुंडली मांडली जाते. यावरून व्यक्तीच्या जीवनात चंद्र या ग्रहाचे किती महत्व आहे हे लक्षात येईल. ❇️ मनुष्य म्हणजे एक शरीररुपी रथ असून, मन हे त्याचे सारथी आहे. शरीराच्या सर्व क्रिया, मनाप्रमाणे चालतात. जसे शरीर दृश्यमान आहे, तसे मन दृश्यमान नाही पण, त्याच्या अनुभूतीतून, त्याचे अस्तित्व जाणवते. 🔺थोडक्यात, शरीर हे वाहन असून, मन हे त्याचे चालक आहे, असे म्हटल्य...